महाराष्ट्रात हंगाम २०२१-२२ मध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. या हंगामात खासगी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १३ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५८२.०० लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५७४.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.८८ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १३९.७१ लाख टन उसाचे गाळप करून १५६.९२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.२३ टक्के आहे.
पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये १३ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११८.८४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात ११९.५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.०६ टक्के आहे.