पाणी, खर्च बचतीसाठी शेतकऱ्यांसाठी ‘सुपरकेन नर्सरी’चा पर्याय फायद्याचा

पुणे : सध्या राज्यात सोलापूर, सांगली, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नुक कारखान्यांना आगामी हंगामात गाळपासाठी ऊस कमी पडण्याची धास्ती वाटत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर आता ‘सुपरकेन नर्सरी’च्या माध्यमातून मात करणे शक्य आहे. राज्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून हे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे.

ऊस पिकाची लागवड ऊस बेण्याने सरळ लागवड करण्याऐवजी एक किंवा दोन गुंठ्यांमध्ये रोपवाटिका केल्यास अत्यंत कमी पाणी द्यावे लागते. रोपवाटिकेमध्ये उसाचे एक डोळे बेणे लावून वाढविल्यास दीड महिना शेताला पाणी देणे वाचते. यात एकरी सरासरी दहा लाख लिटर पाण्याची बचत होते, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिा आहे. सुपरकेन नर्सरी पद्धतीचे मुख्य प्रवर्तक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी तसेच पुणे जिल्ह्यातील जाधववाडी (ता. जुन्नर) येथील उत्तम मारुती जाधव हे नारायणगाव, जुन्नर परिसरात या तंत्राच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत.

जाधव यांनी सुमारे साडेपाच हजार शेतकऱ्यांना सुपरकेन नर्सरी मॉडेल राबवण्यास त्यांच्या शेतांमध्ये मदत केली आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनानंतर जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाचट कुट्टीचे आच्छादन केले आहे. या दोन्ही तंत्रांमुळे पाण्यामध्ये मोठी बचत साध्य होते. सुपरकेन नर्सरीचे अन्य फायदेही आहेत. प्लॅस्टिक ट्रे, प्लॅस्टिक पिशव्या, कोकोपीट अशा खर्चिक बाबी वापरल्या जात नाहीत. त्यामुळे खर्चात बचत होते. पारंपरिक ऊस लागवडीमध्ये बियाणे खर्च व लागवड मजुरी यासाठी सोळा ते सतरा हजार रुपये खर्च येतो. तर सुपरकेन नर्सरीमध्ये फक्त तीन हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच लागवड खर्चात अंदाजे दहा ते बारा हजार रुपये बचत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here