केत्तूर (सोलापूर): येथील करमाळा तालुक्यात गाळप हंगाम सुरु झाला आहे, पण तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने उसाला किती दर देणार हे अजूनपर्यंत जाहीर केलेले नाही. त्यामुळे करमळ्यात उस गाळप हंगामाची गती अगदीच संथ झाली आहे. उस कापणीसाठी गवागावात उस तोडणी मजूर दाखल झाले आहेत.
यावर्षी कोविड 19 च्या महामारीनंतर परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. उसात पाणी साचले, रस्त्यांचीही पूर्ण वाट लागली. त्यामुळे शेतातून वाहन जाणे अवघड आहे. या सार्या परिस्थितीतून शेतातला उस कारखान्यात जाणे उस वाहतुकदार आणि शेतकर्यांसाठी कठीणच आहे. यामुळेच सध्या रस्त्याच्या कडेचा फड याकडे कारखान्यांचा कल वाढला आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील उस बारामती अॅग्रो, अंबालिका शुगर, भैरवानथ शुगर, कमलाई शुगर या कारखान्यांना जातो. पण कारखाने जॅमिंग झाल्याने उस पुन्हा फडात येण्यासाठी उशिर होत आहे. यामुळेच गाळपाचे काम संथ गतीने सुरु आहे.