लखनऊ: गोरखपूर येथील पिपराइच साखर कारखाना ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवणारा पहिला कारखाना असावा. सरकारच्या प्रयत्नामुळे उत्तर प्रदेशचे इथेनॉल उत्पादन 42.37 करोड लिटर इतके आहे. गेल्या वर्षी केलेल्या कामाच्या आधारावर सरकारने यंदा 81.36 करोड लिटर इथेनॉल उत्पादाचे उद्दीष्ट दिले असल्याचे, ऊस राज्यमंत्री सुरेश राणा यांनी विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला सपा सदस्य परवेज अली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
ऊस राज्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत ऊसापासून इतर उत्पादनांची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत शेतकर्यांच्या ऊसाची देणी साखरेवरच अवलंबून राहतील. म्हणून ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग सरकारने शोधला आहे. तब्बल 563 करोड़ रुपयांच्या सहा इथेनॉल निर्मितीच्या योजना उत्तर प्रदेशने स्विकारलेल्या आहेत.
उत्तर प्रदेशात बर्याच वर्षांपासून खांडसारी उद्योग बरबादीच्या उंबरठ्यावर होता, त्याचं एक कारण हेदीखील होतं की, साखर कारखान्यांपासून खांडसारी उद्योगातील अंतर 15 किलोमीटर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते कमी करुन साड़े सात किलोमीटर केलं. तसेच खांडसारी उद्योगासाठी 86 नवे परवानेही जारी केले. अणि गुळाला सर्व करांपासून मुक्त केले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.