बांदा : होळीच्यासणावेळी आता गरीबांना साखरेची अडचण होणार नाही अशी व्यवस्था सरकारने केली आहे. सरकारच्या आदेशानंतर रेशन धान्य दुकानात अंत्योदय रेशनकार्डधारकांना तीन महिन्यांपर्यंत १८ रुपये किलो दराने प्रति कुटूंब एक किलो साखर मिळणार आहे.
वस्तूतः साखर वाटप जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार होते. मात्र, वेळेवर कोटा उपलब्ध न झाल्याने तिन्ही महिन्यांची साखर मार्च महिन्यातच दिली जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या ४८,३४८ इतकी आहे. पुरवठा विभागाचे आयुक्त मनीष चौहान यांनी सांगितले की रेशन धान्य दुकानदारांना धान्यासाठी ७० रुपये क्विंटल दराने लाभांश मिळेल. जेथे जागेवर धान्य पोहोच होणार नाही, तेथए दहा किलोमीटरपर्यंत १५ रुपये आणि ११ किलोमीटरवरील सर्व ठिकाणांना १८ रुपये प्रति किलोमीटर दराने वाहतूक भाडे दिले जाणार आहे.
नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान्य आणि साखरेचे वाटप केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तीन महिन्यांच्या साखरेचा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या वाटपात जर कोणत्याही प्रकारचा घोटाळा आढळला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जावी. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव तिवारी यांनी सांगितले की, सर्व रेशनधान्य दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना फेब्रुवारी महिन्याची साखर घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत त्याचे वितरण सुलभ होईल.