नवी दिल्ली: या वर्षी सणासुदीच्या खरेदी दरम्यान भारतीय ग्राहकांमध्ये चीनी वस्तुं प्रती लोकप्रियता कमी झालेली दिसून येत आहे. केवळ 29 टक्के लोकांनीच बाजारात चीनी वस्तुंबाबत चौकशी केली. ऑनलाइन मंच लोकलसर्किल्स च्या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी बाजारात जवळपास 48 टक्के लोकांनी सणाच्या दिवसात चीनी वस्तुंबाबत चौकशी केली होती.
कंपनीने 14 हजार पेक्षा लोकांचे सर्वेक्षण केले आहे. गेल्या वर्षीही लोकांना जवळपास हेच प्रश्न विचारुुन सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढले होते. कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन सचिन तापडिया म्हणाले की, नोव्हेंबर 2019 मध्ये ग्राहकांना समान प्रश्न विचारले होते आणि 48 टक्के ग्राहकांनी सणासुदीमध्ये चीनी वस्तु खरेदी बाबत विचारले होते. यंदा हा आकडा कमी होउन 29 टक्के झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.