नवी दिल्ली : उच्चांकी पातळीवर पोहोचल्यावर आता गव्हाच्या दरात लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केल्यानंतर सरकार आता खुल्या बाजारात गहू विकण्याची तयारी करत आहे. खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे (OMSS) गहू विकला जाणार आहे. सरकार २० लाख मेट्रिक टन गहू बाजारात विकू शकते, असे सांगण्यात आले.
मनीकंट्रोल वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद करण्यात आली आहे. गरीबांच्या कल्याणासाठीची ही योजना बंद केल्यानंतर सरकारकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत सीएनबीसी – आवाजला मिळालेल्या माहितीनुसार FCI छोट्या व्यापाऱ्यांना २२५० रुपये प्रती क्विंटल दराने गहू उपलब्ध करून देवू शकते. सद्यस्थितीत दिल्लीमध्ये गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गव्हाचे दर २९१५ रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एक एप्रिलपर्यंत सरकारकडे १११ लाख टन गहू असेल असे अनुमान वर्तविण्यात आले आहे.