पंतप्रधान आज देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरू करणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2020 रोजी चित्रकूट येथे देशभरात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना सुरू करणार आहेत.

देशात सुमारे 86 टक्के शेतकरी छोटे आणि अल्पभूधारक असून त्यांच्याकडे 1.1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. छोटे, मध्य आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कृषी उत्पादन टप्प्यात तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, खते आणि किटकनाशकांची उपलब्धता यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांचे उत्पादनांचे विपणन करतांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. शेतकरी उत्पादक संघटना अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांना सामूहिक बळ देतात. या संघटनांचे सदस्य तंत्रज्ञान, वित्त पुरवठा आणि बाजारपेठेत शेतमाल घेऊन जाण्यासाठी मदत करतात, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होईल.

(Source: PIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here