निजामाबाद : निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेडने कामगारांचे गेल्या सहा वर्षांचे थकीत वेतन देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी श्रमिक संघाचे महासचिव एस. कुमार स्वामी यांनी केली. आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची मागणी त्यांनी मंत्री के. टी. रामाराव यांच्याकडे केली.
रविवारी एका पत्रकार परिषदेत कुमार स्वामी म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकांचा कामगारांबाबत उदासीन दृष्टिकोन आहे. कामगारांचे जीवन अतिशय हालाखीचे, दयनीय झाले आहे. विधानसभेतील अर्थसंकल्पीय बैठकीत या प्रश्नी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. उद्योग आणि साखर विभागाच्या मंत्र्यांनी अर्थसंकल्पीय बैठकीत कामगारांच्या पगाराबरोबरच इतर बाबींचा प्रस्ताव तयार करून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली.
कुमार स्वामी म्हणाले, राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजनांबरोबरच अनेक सामाजिक योजनाही लागू करत आहे. जर सरकारने कारखान्याच्या तीन युनीटमधील कामगारांसाठी ५० कोटी रुपये मंजूर केले तर कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.