ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर ५ जानेवारीपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता

बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर येत्या ५ ते ६ जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची गरज नाही, निर्णय होईपर्यंत सर्व काही सुरळीत चालू देणार असल्याचे संघटनांनी ठरवले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्यात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या लवादाचे निर्णय दरवर्षी होतात. त्यानुसार साखर संघाबरोबर आमच्या दोन-चार बैठकाही झालेल्या आहेत. या बैठकीचा पंकजा मुंडे यांनी पूर्ण आढावा घेतलेला आहे. ऊसतोड कामगार संघटनांची भेटही घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here