बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
युक्रेनमधील साखर हंगाम संपला असून, २०१८-१९ या हंगामात साखर उत्पादन १५ टक्क्यांनी घसरले आहे. हंगामात १८ लाख २० हजार टन साखर उत्पादन झाल्याची माहिती युक्रेनच्या सरकारनी न्यूज एजन्सीने दिली आहे.
युक्रेनच्या नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स ऑफ युक्रेन या संघटनेचे उपाध्यक्ष रुसलाना बुट्योलो म्हणाल्या, ‘देशात एकूण ४२ साखर कारखाने आहेत. यंदाच्या हंगामात एकूण १३६ लाख टन बीट गाळप करण्यात आले. गेल्या हंगामातील गाळपाच्या तुलनेत दहा टक्के कमी गाळप झाले. बिटाचे एकरी क्षेत्रच घटल्याने एकूण साखर उत्पादन १५ टक्क्यांनी घसरले आहे.’ देशातील साखरेची गरज आणि निर्यातीसाठी झालेले करार भागवण्यास हे उत्पादन पुरेसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुसलाना यांच्या म्हणण्यानुसार, साखर उत्पादनात कच्च्या मालाचा दर्जा खालावल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. २०१८मध्ये बिटाचे उत्पादन समाधानकारक झाले असले तरी, त्यातील साखरेचा अर्क १६.४७ टक्क्यांवर आला होता. युक्रेनमधील विन्न्यटिसिया प्रांतात ४ लाख २४ हजार, तेर्नोपिल प्रांतात २ लाख २७ हजार तर, पोल्टावा प्रांतात २ लाख २२ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. मुळात युक्रेनमधील साखर उद्योगातील तज्ज्ञांनी हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली होती. युक्रेनमध्ये २०१७-१८च्या हंगामात ६.५ टक्क्यांनी उत्पादन वाढून २१ लाख ४० हजार टनापर्यंत गेले होते.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp