बेंगळुरू, कर्नाटक : ऊसासाठी राज्य समर्थन मूल्य (एसएपी) जाहीर करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत चर्चा केली जाईल, असे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले. या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत उत्तर देताना मंत्री मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये इतर अनेक राज्यांप्रमाणे SAP नाही. मात्र, केंद्र सरकारने १०.२५ टक्के उताऱ्यासह साखरेचा प्रती टन ३,०५० रुपये योग्य आणि लाभदायी दर (FRP) निश्चित केला आहे. तरीही अनेक साखर कारखाने विभागीय स्तरावर FRP पेक्षा १५० ते २०० रुपये जादा देत आहेत.
कर्नाटकमध्ये ऊस दर वाढीसाठी अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या दरात वाढ करण्याची मागणी करत आहेत.