बुढाना : थकीत ऊस बिलांसह विविध समस्यांची सोडवणूक करावी या मागणीसाठी भाकियूचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी भैसाना साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता ५० दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांची ये-जा सुरू आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धरणे आंदोलन थांबवावे या मागणीसाठी अधिकारी दबाव आणत आहेत असा आरोप भाकियूच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आजवर एकही समस्या सोडविण्यात आलेली नाही. विभागातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत, असे भाकियूचे तालुकाध्यक्ष अनुज बालियान आणि विभाग अध्यक्ष संजीव पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना बाजारात काहीच साहित्य उधारीवर मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच विकास त्यागी, राजबीर सिंह, निट्टू, सोबीर, विपिन, धीरसिंह, अनिल सैनी, अबरार, चरण सिंह व अजीत आदी उपस्थित होते.