मेरठ : वातावरण बदलल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. कारखाने वेळेवर सुरू करण्यास सरकारने प्राधान्य दिले. मात्र, दोन दिवसांच्या पावसाने त्यामध्ये अडथळे आले आहेत. पावसामुळे साखर कारखाने वेळेवर चालविण्याची तयारी रखडली आहे.
सरकारच्या निर्देशानुसार ऊस विभागाने सर्व साखर कारखाने सुरू करण्याची तयारी केली होती. मेरठ जिल्ह्यातील मोहिउद्दीनपूर साखर कारखाना २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार होता. लखनौतील अधिकाऱ्यांनीची याच्या तयारीचा आढावा घेतला होता. मात्र, आता गळीत हंगाम पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ऊस खरेदी केंद्रे सुरू होणे अवघड आहे. खासगी कारखाने दिवाळीनंतर सुरू होत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कारखाने सुरू करण्याच्या वेळापत्रकानुसार मोहिउद्दीनपूर ३० ऑक्टोबरला हंगाम सुरू करेल. मवाना कारखाना ३० ऑक्टोबर, दौराला ८ नोव्हेंबर, किनौनी २९ ऑक्टोबर, नंगलामल २९ ऑक्टोबर, सकौती ८ नोव्हेंबरला गाळप सुरू करेल.
मेरठ विभागातील मोदीनगर कारखाने २९ ऑक्टोबर, सिंभावली २७ ऑक्टोबर, वैजनाथपूर हापूड २७ ऑक्टोबर, मलकपूर बागपत ३१ ऑक्टोबर, बागपत ३१ ऑक्टोबर, रमाला २८ ऑक्टोबर, साबितगड-बुलंदशहर ८ नोव्हेंबर, अगौता ७ नोव्हेंबर, अनूपशहर ३० ऑक्टोबरला गाळप सुरू करणार आहे.