सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या उपाययोजनांनंतरही रुपयावरील दबाव वाढला आहे. आज, शुक्रवारी सुरुवातीच्या टप्प्यात रुपयांत १२ पैशांची घसरण झाली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि परकीय गुंतवणूकदारांनी निधी सतत काढून घेतल्यामुळे, शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरून ७९.२५ वर आला. काल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.१३ वर बंद झाला होता. इंटरबँक फॉरेन करन्सी एक्स्चेंज मार्केटमध्ये, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.२० वर खुला झाला आणि नंतर ७९.२५ पर्यंत घसरला. मागील बंद किंमतीच्या तुलनेत रुपयात १२ पैशांची घसरण दिसून आली.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.०५ टक्क्यांनी घसरून १०७.०७ वर आला. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.१७ टक्क्यांनी वाढून १०४.८३ डॉलर प्रती बॅरल झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल ९२५.२२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनेनंतरही रुपया घसरत असल्याचे फॉरेक्स आणि बुलियन विश्लेषक गौरांग सोमय्या यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here