‘पांडुरंग सहकारी’च्या गळीत हंगामाला प्रारंभ

सोलापूर : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ २४ गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात झाली. युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक व बाळासाहेब सालविठ्ठल यांचे हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी स्वागत केले.

यावेळी चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, जेष्ठ संचालक दिनकर मोरे, दिलिप चव्हाण, वसंतराव देशमुख, दाजी पाटील, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब बलमार, भगवान चौगुले, लक्षण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभूते, हणमंत कदम, दिलीप गुरव, सुदाम मोरे, किसन सरवदे, विजय जाधव, शामराव साळुंखे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी साखरेची एम.एस.पी कित्येक वर्षापासून ३१०० रुपये प्रति क्विंटल इतकीच आहे, ती ३७०० ते ३८०० प्रतिक्टिल इतकी होणे गरजेचे आहे. तरच कारखान्याचे आर्थिक गणित बसून जास्तीत जास्त ऊस दर शेतकऱ्यांना देणे सोयीचे होणार आहे. चेअरमन प्रशांत परिचारक यांनी गतवर्षीच्या ऊसाला सर्वाधिक २७५१ रुपये दर दिल्याचे सांगितले. यंदा कारखाना प्रतिदिन साडेआठ हजार ते नऊ हजार मे. टनाने उसाचे गाळप करणार आहे. उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप केले जाणार असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here