भारत-नायजेरिया संयुक्त व्यापार समितीचे दुसरे सत्र पडले पार

अबुजा : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अमरदीप सिंग भाटिया, फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरियाचे भारताचे उच्चायुक्त जी बालसुब्रमण्यम आणि वाणिज्य विभागाच्या आर्थिक आर्थिक सल्लागार प्रिया पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सात सदस्यीय शिष्टमंडळाने 29.04.2024 ते 30.04.2024 या दोन दिवसात नायजेरियन समकक्षांसोबत संयुक्त व्यापार समितीची (JTC) बैठक घेतली. यावेळी JTC चे सह-अध्यक्ष राजदूत नुरा अब्बा रिमी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमधील अलीकडील प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आणि पुढील विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या बाजार प्रवेशाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि कच्चे तेल,नैसर्गिक वायू, फार्मास्युटिकल्स, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टम, ऊर्जा क्षेत्र आणि नवीकरणीय ऊर्जा, कृषी आणि अन्न प्रक्रिया, वाहतूक, रेल्वे, विमान वाहतूक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), विकास आणि शिक्षण आदी क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्यावर भर देण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टीम कराराला लवकरात लवकर अंतिम रूप देण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली गेली.

भारतातील शिष्टमंडळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (IBI), एक्सपोर्ट इम्पोर्ट (EXIM) बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCL) चे अधिकारी समाविष्ट होते. दोन्ही बाजूंचे अधिकारी ‘जेटीसी’च्या कार्यवाहीत सक्रियपणे गुंतले होते. ही चर्चा मैत्रीपूर्ण वातावरणात झाली आणि ती फलदायीही ठरली. अधिक सहकार्य, प्रलंबित समस्यांचे निराकरण, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना आणि लोकांशी संपर्क वाढविण्याबाबतही उत्साही प्रतिसाद मिळाला.

द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणाऱ्या सर्व समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) च्या नेतृत्वाखालील एक व्यावसायिक शिष्टमंडळ देखील अधिकृत शिष्टमंडळासोबत होते. ज्यात ऊर्जा, आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक), दूरसंचार, इलेक्ट्रिकल मशिनरी, फार्मास्युटिकल्स इत्यादी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. भारत-नायजेरिया संयुक्त व्यापार समिती (JTC) च्या दुसऱ्या सत्रातील चर्चा सौहार्दपूर्ण होती.

नायजेरिया हा आफ्रिका क्षेत्रातील भारताचा दुसरा सर्वात मोठा आणि प्रमुख व्यापारी भागीदार आहे. भारत आणि नायजेरिया दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2022-23 मध्ये US$11.8 अब्ज, 2023-24 मध्ये 7.89 अब्ज होता. US$27 अब्जच्या एकूण गुंतवणुकीसह सुमारे 135 भारतीय कंपन्या नायजेरियन बाजारपेठेत सक्रियपणे गुंतलेल्या आहेत. ही सर्व गुंतवणूक पायाभूत सुविधा, उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here