मनीला : देश गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या टंचाईशी झुंज देत आहे. खराब हवामान आणि उच्च उत्पादन खर्च यासोबतच साखर आयातीमध्ये उशीर झाल्याने देशातील उत्पादनात घसरण झाली आहे. बाजारात अपुऱ्या पुरवठ्यामुळे साखरेची किरकोळ किंमत P१०० प्रती किलोग्रॅम पेक्षा अधिक झाली आहे. फिलिपाईन्स सांख्यिकी प्राधिकरणाच्या (पीएसए) नव्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात महागाईचा दर वाढून ६.४ टक्क्यांवर पोहोचला. मुख्यत्वे अन्न आणि शियपेयाच्या पदार्थांमध्ये गतीने दरवाढ झाली आहे.
पुरवठ्यातील तुट आणि किमतीमधील वाढ दूर करण्यासाठी साखर नियामक प्रशासानाने (एसआरए) ३,००,००० मेट्रिक टन (एमटी) साखर आयातीवर भर दिला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स (एनएफएसपी) चे अध्यक्ष एनरिक रोजस यांनी सांगितले की, देशांतर्गत साखरेचा पुरवठा पाहिला तर रिफाईंड आणि कच्ची अशा दोन्ही साखरेचा तुटवडा आहे. अर्थव्यवस्थेसोबत साखरेच्या कमी पुरवठा व जादा मागणीमुळे एसआरएने सुचविलेली रिफाईंड साखरेची किरकोळ किंमत P५० प्रती किलोग्रॅम और आणि कच्च्या साखरेची किंमत पी ४५ प्रती किलोग्रॅम ही दुप्पट झाली आहे.
एसआरएकडील आकडेवारीनुसार, २४ जुलैपर्यंत साखरेचे उत्पादन १.७९२ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचले आहे. जे गेल्या वर्षी उत्पादित २.१३९ मिलियन मेट्रिक टनापेक्षा १६.१८ टक्क्यांनी कमी आहे. कमी साखरेच्या अनुमानामुळे एसआरएने फेब्रुवारी महिन्यात शुगर ऑर्डर ३ (SO3)अंतर्गत २,००,००० मेट्रिक टन प्रक्रिया केलेली साखर आयातीची योजना सुरू केली. आयात साखरेमुळे बाजारातील साखरेचा तुटवडा भरून निघेल आणि किमतीमधील वाढ रोखता येईल.