चालू हंगामात सितारगंज कारखाना पीपीपी तत्वावर सुरू होणार

हल्द्वानी : जिल्हा परिषद अध्यक्ष रेणू गंगराव यांनी ऊस तथा साखर उद्योग मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांच्याकडे कार्यक्षेत्रातील साखर कारखाना तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. ऊस मंत्र्यांनी या हंगामात कोणत्याही परिस्थितीत कारखाना पीपीपी तत्त्वावर सुरू केला जाईल असे आश्वासन दिले.

कामगार तथा रोजगार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य सुरेश गंगवार आणि त्यांच्या पत्नी रेणू गंगराव यांनी ऊस मंत्री यतीश्वरानंद यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष रेणू गंगवार यांनी पत्रात म्हटले आहे की, २०१७ पासून सितारगंज येथील किसान सहकारी साखर कारखाना बंद आहे. मात्र, या परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कारखाना सुरू नसल्याने शेतकऱ्यांचा हिरेमोड होत आहे.

कारखाना तातडीने सुरू करावा अशी मागणी त्यंनी ऊस मंत्र्यांकडे केली. यापूर्वी सुरेश गंगवार यांनी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची भेट घेऊ बिज्टी आणि नटकपुरा येथील अपूर्ण रस्ता तसेच नाल्यांचा प्रश्ना मांडला हता. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here