शेअर बाजाराने घेतली जोरदार उसळी, सेन्सेक्स ५५७ अंकांनी वधारला

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ५५७.४५ अंकांनी वधारला आणि ७६,९०५.५१ वर बंद झाला, तर निफ्टी १५९.७५ अंकांनी वधारला आणि २३,३५०.४० वर बंद झाला.बीपीसीएल, ओएनजीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स हे निफ्टीमधील शेअर्स मोठ्या प्रमाणत वाढले तर हिंडाल्को इंडस्ट्रीज, विप्रो, ट्रेंट, इन्फोसिस, टाटा स्टीलमध्ये घसरण पाहायला मिळाली.

गुरुवारी सेन्सेक्स ८९९.०२ अंकांनी वधारून ७६,३४८.०६ वर तर निफ्टी २८३.०५ अंकांनी वधारून २३,१९०.६५ वर बंद झाला होता. गुरुवारच्या ८६.३६ च्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी भारतीय रुपया ३९ पैशांनी वधारून ८५.९७ प्रति डॉलरवर बंद झाला. या आठवड्यात शेअर बाजारात काही प्रमाणात सकारात्मकता पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here