आजमगढ : सठियांव साखर कारखान्याच्या आसवनी प्लान्टमधून या हंगामात इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले आहे. विविध कंपन्यांना या इथेनॉलची विक्री करून कारखान्याने ३ कोटींचा नफा कमावला आहे.
सठियांव साखर कारखान्याने यंदाच्या २०२०-२१ या गळीत हंगामात ४५.५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले होते. सद्यस्थितीत २४ लाख क्विटल उसाचे गाळप झाले असून ८.६७ टक्के साखर उताऱ्यासह दोन लाख चार हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने आतापर्यंत ९५ लाख क्विंटल साखरेची विक्री करून थकीत देणी दिली आहेत. मात्र, चालू हंगामातील पैसे अद्याप दिलेले नाहीत. याशिवाय कारखान्याने १५ हजार मेगावॅट विजेचे उत्पादन केले आहे. साखर कारखाना अद्याप आपल्या उद्दीष्टापेक्षा खूप दूर असला आणि तोट्यात असला तरी यंदा आसवनी प्लान्टमधून २३ टक्के उताऱ्याने ३६.३१ लाख लिटर इथेनॉलचे उच्चांकी उत्पादन करण्यात आले आहे. आसवनी प्लान्टमध्ये अद्याप ४९३ हजार लिटर इथेनॉल शिल्लक आहे. सद्यस्थितीत तीन कोटींचा नफा झाल्याचे आसवनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले. येथून भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान आणि इंडियन ऑइल या कंपन्यांना इथेनॉल पुरवठा केला जातो.