भोगपूर : दि भोगपूर सहकारी साखर कारखाना लिमिटेडचा यंदा ६७ वा गळीत हंगाम आहे. या हंगामात ३,००० टीडीएस क्षमतेच्या प्लांटद्वारे कारखाना चालणार आहे. त्यातून १५ मेगावॅट विजेचेही उत्पादन केले जाणार आहे. भोगपूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष परमवीर सिंह पम्मा यांनी ही माहिती दिली. यावेळी सरव्यवस्थापक अरुण कुमार अरोरा, चीफ इंजिनीअर राकेश कुमार सिगला उपस्थित होते. यावेळी आग लागून जळालेले टर्बाईन दुरुस्तीसाठी बेंगळुरूला दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार चेअरमन पम्मा यांनी सांगितले की, एक महिन्यात या टर्बाईनची दुरुस्ती होईल. काही स्थानिक शेतकऱ्यांकडून विविध कारणांमुळे कारखाना उशीरा गाळप करेल अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, कारखान्याचे व्यवस्थापन व संचालक मंडळ तातडीने मशीनच्या दुरुस्तीचे काम करीत आहे. पंजाब सरकार व सहकार विभागाचे मंत्री कुलदिप सिंह धालीवाल यांच्या निर्देशानुसार, कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ या हंगामात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही. बाँडनुसार ऊस खरेदी केला जाईल. यावेळी ऊस विकास अधिकारी सुखदीप सिंह कैरो, ऊस विभागाचे निरीक्षक प्रेम बहादर सिंह, चीफ केमिस्ट विमल कुमार, लॅब इन्चार्ज गुरिदर सिंह लाली, सरताज सिंह विर्क, गुरविदर सिंह, इंद्रजीत सिंह बैंस व शेतकरी चैंचल सिंह जोडा आदी उपस्थित होते.