सुल्तानपूर : किसान सहकारी साखर कारखाना साफसफाईसाठी पाच फेब्रुवारी रोजी बंद राहाणार आहे. जवळजवळ ३६ तासांनंतर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकेल. या दरम्यान ऊस खरेदीही बंद राहाणार आहे. कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी राधेश्याम यांनी सांगितले की पहिल्या सफाईच्या कामासाठी पाच फेब्रुवारी रोजी सकाळपासून कारखाना बंद ठेवला जाणार आहे.
तब्बल ३६ तासांनंतर सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारखान्याचे कामकाज पुन्हा सुरू होऊ शकेल. कारखान्यातील शिल्लक साठा पाहता ऊस खरेदी केंद्रांवर तीन फेब्रुवारी आणि कारखान्याच्या गेटवर चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेतपर्यंतच ऊस खरेदी केली जाणार आहे. नियमीत सफाईनंतर ऊस खरेदी केंद्रांवर पाच फेब्रुवारी रोजी आणि कारखान्याच्या गेटवर सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर ऊस खरेदी सुरू केली जाणार आहे.
किसान सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक प्रताप नारायण म्हणाले, आतापर्यंत ३ लाख २८ हजार ५०० क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. कारखान्याची यंत्रसामुग्री सुरळीत ठेवण्यासाठी साफसफाई, दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी कारखाना ३६ तासांसाठी बंद राहील.