बिजनौर :
डीएम रमाकांत पांड्ये यांनी गेल्या वर्षीच्या गाळप हंगामातील थकबाकी न भागवणार्या साखर कारखान्यांच्या अधिक़ार्यांबरोबर बैठक़ घेतली. कारखान्यांनी जानेवारीमध्येच शंभर टक्के थकबाकी भागवण्याबाबत सांगितले.
गेल्या गाळप हंगामातील बिलाई साखर कारखान्याचे 45 करोड, चांदुपर साखर कारखान्यावर 39 करोड, बिजनौर साखर कारखान्यावर 25.94 करोड आणि नजीबाबाद साखर कारखान्यावर 9.33 करोड रुपये देय आहेत. डीएम यांनी सांगितले की, गेल्या गाळप हंगामातील थकबाकी यापूर्वीच भागवली जाणे आवश्यक होते.
आता कोणत्याही प्रकारची कसूर खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याने वेळेत पैसे द्यावेत किंवा कारवाई साठी तयार रहावे.
गेल्या वर्षीचे पैसे देण्याबरोबरच साखर कारखान्याने चालू गाळप हंगामाचेही पैसे लवकर द्यावेत किंवा कारवाईसाठी तयार रहावे.
बिलाई आणि बिजनौर साखर कारखान्याच्या अधिकार्यांकडून जानेवारीमध्ये, चांदपुर कारखान्याकडून 15 ते 20 जानेवारी तसेच नजीबाबाद साखर कारखान्याकडून 11 जानेवारीपर्यंत गेल्या वर्षाची सर्व थकबाकी भागवण्याबाबत सांगितले. दरम्यान जिल्हा उस अधिकारी यशपाल सिंह आणि कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.