साखर कारखाना शेतकऱ्यांना स्वस्त साखर देणार

फरुखाबाद : गंगापार येथील ऊस हरदोई जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात गळीतासाठी पाठवला जातो. मात्र, शेतकऱ्यांना गेल्या २५ दिवसांपासून ऊस बिल मिळालेले नाही. आता शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रत्येकी एक क्विंटल साखर विक्रीचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी ही साखर हरियाली शेतकरी बाजारमधून बाजारभावापेक्षा कमी दराने खरेदी करू शकतील. आतापर्यंत गंगापार येथील एका साखर कारखान्याला ५५४३४८ क्टिंटल ऊस पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना २२ डिसेंबरपर्यंत गळीतास आलेल्या ऊसाचे पैसे मिळाले आहेत. मात्र गेल्या २५ दिवसांपासून बिले मिळालेली नाहीत. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाली शेतकरी बाजारमधून प्रत्येकी एक क्विंटल साखर शेतकऱ्यांना मिळेल.

याबाबत सुपरवायझर राजीव मिश्रा म्हणाले, चार हजार शेतकऱ्यांना साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट रेटपेक्षा कमी दराने साखर मिळेल. साखर घेताना शेतकऱ्यांना ऊस पाठविल्याची पावती दाखवावी लागेल. जे शेतकरी साखर घेऊ इच्छितात, त्यांनी काही अडचणी आल्यास संपर्क साधावा असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here