वेल्लोर, तामिळनाडू: वेल्लोर सहकारी साखर कारखान्यात अलिकडेच आगीत जळालेल्या कन्व्हेअर बेल्टच्या दुरुस्तीसाठी आवश्यक १.५० कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा निधी आहे. असे कारखान्याचे अध्यक्ष एम. आनंदन यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्मचारी अद्यापही नुकसानीचा तपशील जमा करत आहेत. विमा कंपन्यांनी नुकसानीच्या जवळपास ५० टक्के रक्कमच देण्याची तयारी दर्शवली आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, सध्या आम्ही आर्थिकरित्या चांगल्या परिस्थितीत आहोत. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर दुरुस्तीचे काम सुरू करण्याची तयारी करत आहोत. आतापर्यंत कमीत कमी पाच कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर कले आहेत. पुढील गळीत हंगामाच्या आधी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची तयारी आहे. गळीत हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे.