रायपूर : छत्तीसगढचे सहकार मंत्री डॉ. प्रेमसाय सिंह टेकाम यांनी केरता येथील माँ महामाया साखर कारखान्यात २ मेगावॅट विज उत्पादन प्लांटचे उद्घाटन करताना सांगितले की, कारखान्याला या प्लांटमुळे दर महिन्याला किमान १ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
या दोन मेगावॅट विज उत्पादनाबरोबरच साखर कारखान्यासाठी आणखी एक महत्त्वाची बाब झाली आहे. आणि याचा कारखान्यासोबतच शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. मंत्री टेकाम म्हणाले की, हा या विभागातील तिसरा विजेचा प्लांट आहे. साखर कारखाना परिसरात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली.