शामली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी स्वच्छता मोहिमेंतर्गत सॅनिटायझेशनच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत स्वतः वस्तीमध्ये सॅनिटायझेशन केले.
कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी आपल्या थानाभवन या आपल्या शहरात सॅनिटायझेशन अभियानात सहभाग नोंदवत गरीब वस्तीत स्वतः सॅनिटायझेशन केले. ते म्हणाले, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सातत्याने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या तर कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्याच पद्धतीने मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गावे आणि शहरे सॅनिटायझेशन करण्याचे, स्वच्छ भारत मिशन राबविण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी राणा यांनी थानाभवनमधील गरीब वस्तीत स्वतः सॅनिटायझेशन कार्यक्रमात भाग घेतला. आम्ही सर्वजण कोरोनाशी लढाई करू शकतो. लोकांनी घरांमध्येच थांबावे. जोपर्यंत गरज नसेल तोपर्यंत घरातून बाहेर पडू नये. मास्क लावूनच घरातून बाहेर पडावे. आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन मंत्र्यांनी केले.