सर्वेक्षणात दावा, महामारीच्या भितीमुळे 90 टक्के लोक खर्च करत आहेत जपून

मुंबई: कोरोनाच्या सातत्याने वाढणार्‍या नव्या रुग्णांमुळे रोजगार आणि आर्थिक सुधारणाबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. याचा परिणाम लोकांच्या खर्चावरही दिसून येत आहे. स्टैंडर्ड चार्टर्ड बँकेच्या सर्वेनुसार, महामारीच्या भितीमुळे प्रत्येक 10 पैकी 9 भारतीय अर्थात 90 टक्के लोक खर्च करण्यात सतर्कता बाळगत आहेत.

याशिवाय 76 टक्के लोक हे मानतात की, महामारी ने त्यांना खर्चांवर विचार करण्यास मजबूर केले आहे. जागतिक स्तावर 62 टक्के लोक असा विचार करतात. याशिवाय, 80 टक्के भारतीय बजेट बनवणारे साधन वापर करत आहेत किवा पुन्हा असे उपाय करत आहेत, ज्यामध्ये एका मर्यादेनंतर त्यांच्या कार्डावरील खर्चावर रोख लावू शकतात. 78 टक्के भारतीयांनी सांगितले की, ते ऑनलाइन खरेदी पसंत करतील.

महामारीच्या पुर्वीच्या तुलनेत भारतासह जगामध्ये ग्राहक आता किराणा, आरोग्य, डिजिटल उपकरणांसारख्या पायाभूत वस्तूंवर खर्च करत आहेत. हा सर्वे 12 देशातील भारत, चीन, ब्रिटन, हॉंगकॉंग, यूएई,केनिया, यूएस, मलेशिया, सिंगापूर, ताइवान, पाकिस्तान, इंडोनेशिया च्या 12,000 लोकांच्या चर्चेवर आधारीत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here