महिलांच्या जीवनात पसरला ऊसाचा गोडवा

लखनौ: ऊस शेतीमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर महिलांच्या जीवनातही गोडवा वाढू लागला आहे. राज्यातील ३७ प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांतील स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून प्रगत प्रजातीची रोपे तयार करून ६० हजार महिलांना स्वयं रोजगार मळाला आहे. यासाठी जवळपास ४ लाख मानवी दिवसांचे काम पूर्ण झाले आहे. महिलांनी प्रगत प्रजातीच्या वाणाची रोपे तयार केली आहेत. त्यामुळे उसाचे उत्पादन, क्षेत्र, साखर उतारा आणि त्यापासून ऊस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढीसाठीही महिलांचे योगदान लाभले आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यातील ३७ जिल्ह्यांतील ऊस विकास परिषदा तसेच साखर कारखान्यांनी संयुक्त रुपात गावांची निवड करून महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना प्रशिक्षण देण्याची सोय केली. त्या अंतर्गत महिलांना अनुदानाच्या माध्यमातून आणि कारखान्यांच्या सहयोगाने आवश्यक मशीनरी, यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. या गटांकडून १० लाखांहून अधिक ऊसाच्या रोपांचे उत्पादन करण्यात येत आहे. या समुहांपैकी जागृती महिला स्वयंसहायता समूह बुलंदशहर, अन्नपुर्णा महिला स्वयंसहायता समूह बरेली, गंगा महिला स्वयं सहायता समुह सहारनपूर आदींनी चांगला पुढाकार घेतला आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या गटांना विभागाकडून सन्मानितही करण्यात आले आहे. ३७ ऊस उत्पादक जिल्ह्यातील ३,००३ महिला स्वयं सहायता गटांनी आतापर्यंत २४६३ लाख सिडलिंगचे उत्पादन केले आहे. त्यापासून त्यांना ६४७८ लाख रुपये तथा प्रती समुह ७५ हजार ते २७ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here