नवी दिल्ली : भारत जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत हरित ऊर्जा उत्पादनात अग्रेसर देश आहे. आणि २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे उद्दीष्ट वेळेवर गाठले जाईल असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले.
ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन मिश्रण आणि वैकल्पिक स्त्रोतांकडून जैव इंधनाच्या उत्पादनावर खास भर दिला जात आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ते निश्चितच गाठले जाईल. जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठक २०२२ मध्ये बोलताना पुरी यांनी नरेंद्र मोदी सरकारने २०१४ नंतर घेतलेल्या विविध परिवर्तनकारी निर्णयांची मांडणी केली. उद्योगातील प्रमुख संस्था सीआयआय आणि इंडिया स्पोराद्वारे हे सत्र ‘परोपकार, उद्योजकता आणि सामाजिक प्रभावासाठी भारतीय प्रवासी शक्ती वाढवणे’ या विषयावर आयोजित करण्यात आले होते.