सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याने आगामी २०२३ – २४ गळीत हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन डेप्युटी जनरल मॅनेजर के. आर. कदम आणि पी.टी. तुपे यांच्या हस्ते झाले. गाळप हंगामासाठी ट्रक, बैलगाडी आणि हार्वेस्टर मशीनचे करार करण्यात आले आहेत. कारखान्यात आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे. रोलर पूजनवेळी एस.एन.औताडे, पी.डी. घोगरे, आर. एच.घुले, ए.व्ही. गुळमकर, सी. जे. कुंभार, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
१६ जूनला कारखान्यासाठी मतदान…
सध्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. यामध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या विरोधात अभिजित पाटील हे मैदानात उतरले आहेत. कारखान्यासाठी १६ जून २०२३ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष्य लागले आहे.