सुवा: शुगर ट्रिब्युनलने २०२१ मधील गाळप हंगामाच्या तारखांची घोषणा सुरू केली आहे. लुटोका कारखाना ४ जून रोजी गाळप सुरू होईल. तर रारावई कारखाना २३ जूनपासून गाळप सुरू करणार आहे. लाबासा कारखाना ७ जुलै २०२१ रोजी सुरू होईल.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक दिवस आधी उसाची तोडणी करून ऊस कारखान्याला पाठविण्यास सुरू करावा असे आवाहन शुगर ट्रिब्युनलचे रजिस्टार टिमोथी ब्राऊन यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून लुटोकामध्ये कोविड १९ मुळे सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर देशभरातील सुपर मार्केटमध्ये साखर साठा संपल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र एफसीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोएल अब्राहम यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.