साखर बाजारावर २०१९ मध्ये अनिश्चिततेचे सावट

नवी दिल्ली : चीनी मंडी
साखरेचा हंगाम जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा आहे. पण, २०१८च् या शेवटच्या महिन्यात वर्षभरातील साखर उद्योगाचा विचार केला. तर, या वर्षीपेक्षा पुढचे वर्ष आणखी आव्हानात्मक असल्याचे चित्र आहे. यंदा साखरेच्या दरांत १७ टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ब्राझीलमधील इथेनॉलची वाढती मागणी हा बाजारपेठेसाठी एक आशेचा किरण होता. पण, त्या परिस्थितीतही बदल झाल्यामुळे पुढच्या वर्षीचा हंगाम आणखीनच आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.
ब्राझीलमध्ये साखर कारखाने साखर किंवा जैव इंधन तयार करू शकतात. २०१८ मध्ये सुरुवातीला जगात कच्चा तेलाचे भाव वाढल्याने ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादनावर भर देण्यात आला. जेणेकरून साखरेचा अतिरिक्त साठाही कमी होण्यास मदत होईल. पण, गेल्या काही दिवसांतील कच्च्या तेलाचे घसरलेले दर पाहिले, तर परिस्थिती नेमकी उलटी होण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये वाहने इथेनॉलवरही चालतात. तेथे पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर, कच्च्या तेलाच्या किमतीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी किमत होत असले, तर तेथील नागरिक पर्यायी इथेनॉलचा वापर करतात. कारण, त्यांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे असते. सध्या कच्च्या तेलाचेच दर घसरत असल्यामुळे त्याचा वापर अधिक होत आहे आणि दुसरीकडे पर्यायी इंधन असलेल्या इथेनॉलची किंमत कमी होत आहे.
युरोप आणि थायलंडमध्येही बंपर साखर उत्पादन होत असल्यामुळे सर्वांत मोठा उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये साखर उत्पादनाची गळती सुरूच राहील. त्यामुळे ऑगस्टच्या दरम्यान गेल्या दहा वर्षांतील निचांकी ९.९१ सेंटस इतका दर घसरण्याचा अंदाज आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराने ब्राझीलमधील इथेनॉलची मागणी आणि भारताची निर्यात क्षमता पाहिली. त्याचवेळी कच्च्या तेलाचे भाव घसरले आणि त्यामुळे इथेनॉलचे महत्त्व कमी होऊन साखरेच्या दरालाही घसरण लागली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर उद्योगातील गुंतवणूकदारांना आणखी दर घसरण्याची शक्यता वाटत आहे. २०१९ मधील साखरेच्या बाजारपेठेविषयी अजूनही अस्पष्टता व्यक्त होत आहे. ब्राझीलच्या चलनाच्या दरातील चर उतारांचाही यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, तेथील निर्यातदार डॉलरमध्ये मिळणाऱ्या किमतीत साखर निर्यात करण्यास जास्त उत्सुक आहेत.
दुसरीकडे भारतातील उच्चांकी साखर उत्पादनाचाही परिणाम दिसणार असल्याचे मत लंडनमधील मारेस्क स्पेक्ट्रॉन यांनी व्यक्त केले आहे. साखरेला कमी दर मिळत असल्याने युरोपिय युनियन तेथील शेतकऱ्यांना बिटाऐवजी गव्हाच्या उत्पादनाकडे वळण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कमधील ईडी अँड एफ मॅन कॅपिटल मार्केटसचे मायकेल मॅकडगल्ल यांनी सांगितले की, व्यापारी आणि विश्लेषकांसाठी सर्वांत मोठी चिंता तेलाच्या दरांची आहे. कच्चे तेल साखरेचे दर खाली घेऊन जाईल. आपण ब्राझीलमधील ऊस हंगामाचा वाट पाहत असलो तरी, भविष्यात खूप मोठ्या काळासाठी साखर उद्योगाला अनिश्चिततेला सामोरे जावे लागणार आहे.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here