पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या दोन वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपये खर्चासह ‘मिशन मौसम’ ला मंजुरी दिली आहे.
मिशन मौसम प्रामुख्याने भू विज्ञान मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणार आहे, हे भारताच्या हवामान आणि हवामानाशी संबंधित विज्ञान, संशोधन आणि सेवांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी एक बहुआयामी आणि परिवर्तनशील उपक्रम ठरेल अशी अपेक्षा आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी नागरिक आणि वापरकर्त्यांसह संबंधितांना अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्यात मदत करेल. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम दीर्घकाळात समुदाय, क्षेत्रे आणि परिसंस्थांमध्ये क्षमता आणि लवचिकता वाढवण्यात मदत करेल.
मिशन मौसमचा एक भाग म्हणून, भारत वातावरणीय विज्ञान, विशेषत: हवामान निरीक्षण, मॉडेलिंग, अंदाज आणि व्यवस्थापन यातील संशोधन आणि विकास तसेच क्षमता यात वेगाने विस्तार करेल.
(Source: PIB)