मुरादाबाद : छजलेटच्या सहकारी ऊस समिती अंतर्गत स्योहारा, दिवाण व त्रिवेणी साखर कारखान्याच्यावतीने उसाच्या नोंदी पडताळीचे काम गतीने सुरू आहे. ऊस विभागाने व साखर कारखान्यांनी केलेल्या संयुक्त ऊस सर्व्हेनंतर या नोंदीची खातरजमा केली जात आहे.
लाईव्ह हिंदुस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्यांच्यावतीने उसाच्या तोडणी नोंदीचा सर्व्हे करण्यात आला आहे. ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व्हेचे हे काम अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कांठ सहकारी ऊस समितीच्या अंतर्गत तिन्ही साखर कारखान्यांचे कर्मचारी, अधिकारी ऊस नोंदीची पडताळणी करीत आहेत. याबाबत सहकारी ऊस समितीचे सचिव मुकेश कुमार सक्सेना यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ज्या काही समस्या असतील, त्याचे तातडीने निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.