नवी दिल्ली : आगामी काळात संपूर्ण जगाला तांदळाच्या टंचाईची गंभीर समस्या भेडसावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत फिच सोल्युशन्सने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार प्रमुख तांदूळ उत्पादक देशांमध्ये उत्पादन झपाट्याने घटले आहे. आगामी काळात हा उत्पादनाचा आलेख आणखी खाली जाताना दिसत आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये तांदळाचे उत्पादन पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. हे उत्पादन काही लाख टन नव्हे तर त्याहून अधिक घटले आहे. फिच सोल्युशन्सचे कमोडिटी विश्लेषक चार्ल्स हार्ट यांच्या मते, यावर्षी बाजारात सुमारे १८.६ दशलक्ष टन तांदळाचा तुटवडा भासेल. फिंच सोल्युशन्सच्या अहवालानुसार २००३-०४ मध्ये जगात तांदळाची अशी कमतरता होती.
रशिया-युक्रेन युद्ध, चीन आणि पाकिस्तानसारख्या तांदूळ उत्पादक देशांतील खराब हवामान, हवामान बदल ही उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे आहेत. शिवाय लोकांची शेतीची आवड कमी होत चालली आहे. दरम्यान, भारतात नेहमीच तांदळाचे उत्पादन चांगले होते. प्रत्यक्षात २०१२-१३ पासून येथे दरवर्षी एक लाख टनांहून अधिक तांदळाचे उत्पादन होत आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये भारतात १,२९,४७१ टन उत्पादन झाले. त्यानंतर २०२२-२३ मध्ये भारतात तांदळाचे उत्पादन १,३६,०० टन झाले. तर २०२३-२४ मध्ये ते कमी होऊन १,३४,००० टन झाले. इतर देशांतील स्थिती पाहता भारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे.