एक एप्रिलपासून २१२५ रुपये प्रती क्विंटलने गहू खरेदी करणार योगी सरकार

लखनौ : एक एप्रिलपासून किमान समर्थन मूल्यावर गव्हाची सरकारी खरेदी सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदावेळी २१२५ रुपये प्रती क्विंटल दराने सरकारी खरेदी एजन्सी शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी सुरू करतील. गेल्यावर्षी सरकारी समर्थन मूल्य २०१५ रुपये होते. यंदा यामध्ये ११० रुपये प्रती क्विंटलची वाढ करण्यात आली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी अन्न विभागाची वितरण शाखा, पीसीएफ, पीसीयू, एफसीआय, नाफेड आणि बाजार परिषदेकडून गव्हाची खरेदी होईल. या खरेदीसाठी ६,००० केंद्रे तयार केली जातील. राज्याने ६० लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्यावर्षी खुल्या बाजारात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांऐवजी अडते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना गव्हाची विक्री केली होती. त्यावेळी ३.३६ लाख मेट्रिक टन गव्हाची सरकारी खरेदी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here