टूंडला: पोलीस ठाण्यानजिकच्या साखर व्यावसायिकाच्या घरी रात्री लाखोंची चोरी झाली. सोने आणि रोकडसह २४ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी पळवला. येथील अग्रवाल कुटुंबीय देवदर्शनाला गेले होते.
साखर व्यावसायिक प्रदीप अग्रवाल यांचे येथे निवासस्थान आहे. हे निवासस्थान टूंडला ठाण्याजवळच आहे. प्रदीप हे रविवारी रात्री कुटुंबियांसह राजस्थानला कैला देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी घराचे कुलूप तुटलेले पाहून शेजाऱ्यांनी त्यांच्या भावाला याची माहिती दिली. सुमीत अग्रवाल यांनी चोरीची माहिती प्रदीप यांना आणि पोलिसांना दिली. घरात १५ लाख रुपये, २५ तोळे सोने आणि रिवॉल्व्हर होते असे प्रदीप यांनी सांगितले. घरात सध्या रिवॉल्व्हर आणि अडीच लाख रुपये सापडले आहेत. उर्वरीत पैसे, सोने आणि दोन लॅपटॉप गायब आहेत. चोरट्यांनी कपाट तोडून पैसे, सोने पळवले.
दरम्यान फॉरेन्सिक युनीटने तपास केला आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. काही धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच चोरट्यांचा पर्दाफाश केला जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिक्षक अजय कुमार पांडेय यांनी सांगितले.