उस आंदोलनावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमलेल्या समितीला गुरुवारी रात्री उशिरा मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये संघटनेने दिलेल्या नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांकडे माहिती मागविली आहे.  घटना व कारखानदारांमध्ये संवाद सुरू झाल्याने ऊसदराचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.समितीच्या कामकाजाकडे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, साखर कारखान्यांकडून विजय औताडे, पी. मेढे, योगेश श्रीमंत पाटील आदी उपस्थित होते.   मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये व चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर द्या, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चे गेली दीड महिना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. याबाबत, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदार, संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. मागील ४०० रुपयांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत संघटनेच्यावतीने स्वस्तिक पाटील यांनी कारखान्याकडून मागील हंगामातील अपेक्षित माहितीचा नमुना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखान्यांना पाठवून माहिती सादर करण्याचे आदेश दिले. आगामी दोन दिवसांत यावर चर्चा होऊन तोडगा निघू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here