फिलीपीन्स मध्ये साखर उत्पादनाच्या आकडयांमुळे मोठा गोंधळ सुरू आहे. साखर उद्योगाने अलीकडेच साखर नियामक प्रशासनाद्वारे साखर उत्पादनाच्या पुर्वानुमानावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आरोप केला की, नियामक प्रशासन गेल्या चार वर्षापासून उत्पादन अधिक असल्याचे सांगत आहेत आणि ते थांबवायला सांगितले आहे. नियामक प्रशासनाने २०१९/२० या हंगामासाठी २.०९६ दशलक्ष मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. हा हंगाम सप्टेंबर मध्ये सुरु झाला असून पुढील वर्षाच्या ऑगस्ट मध्ये संपणार आहे.
मल्टी सेक्टोरल ग्रुप ततक कलामय २०१९/२० हंगामाच्या उत्पादन अनुमानांसाठी स्पष्टीकरणाची मागणी करत आहेत. ततक कलामयचे प्रवक्ता रेमंड माँटिनोला साखर नियामक प्रशासनाला झिडकारत म्हणाले, गेल्या चार वर्षातील प्रशासनाच्या रेकॉर्डवरून असे समजते की, त्यांनी वर्तवलेले अंदाज वास्तवतेपासून दूर राहीले आहेत. हे गंभीर दखल घेण्यासारखे आहे, कारण उत्पादनाच्या अंदाजाचा बाजारावर परिणाम होत असतो.
गेल्या वर्षी, नियामक प्रशासनाने २.२२५ दशलक्ष मेट्री्क टन उत्पादनाचा अंदाज लावला होता, जे २.०७३ दशलक्ष मेट्रीक टनाच्या वास्तविक उत्पादनापेक्षा १५२००० मेेट्रीक टन अधिक होते. अलीकडेेच, देशात साखर मूल्यातील वाढीपासून वाचण्यासाठी, साखर नियामक प्रशासनाने २५०००० मेट्रीक टन रिफाइंड साखर आयाातीला अनुमती दिली होती. या गोष्टी वरही साखर उद्योगातील अनेकांनी टिका केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.