पुणे: कोरोना वायरसमुळे चीन वगळता इतर सर्व देशांमध्ये साखर निर्यात नियमित सुरु असल्याचे दिसत आहे. या वायरसने जगभर धुमाकुळ घातला आहे, पण चीनला होणारी साखरेची निर्यात मात्र थांबली आहे. याचा फटका भारतीय साखर उद्योगाला बसण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
चीनला भारतातून दरमहा दहा ते पंधरा हजार टन पांढरी साखर निर्यात होते. करारानुसार साखर बंदरात पोहोचविणे व ती जहाजातून संबंधित देशांना पाठवण्याचे काम नियमित सुरु आहे. चीनला निर्यात होणारी साखर इतर देशांच्या तुलनेत कमी असली तरी , त्यावर थोडासाच परिणाम झाल्याचे साखर तज्ञांनी सांगितले.
चीनमध्ये सध्या कच्च्या साखरेची निर्यात होत नाही. इतर देशांच्या तुलनेत साखरेचे करार कमी असले, तरी करार झालेली साखर मात्र चीनकडे पाठवणे सध्या तरी शक्य नसल्याची परिस्थिती आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.