महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारचा एकही रुग्ण नाही: आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

चीनसह इतर अनेक देशांमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणू बीएफ ७चा शोध लागला आहे. महाराष्ट्रात मात्र, सध्या या प्रकारचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे चिंतेचे काहीच कारण नाही. मात्र, राज्यातील लोकांनी सुरक्षितता राखावी आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन राज्याचे कुटूंब कल्याण तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. मंत्री सावंत यांनी सांगितले की, नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे संक्रमण ओम्रिकॉनपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत मुंबई लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत चाचणी, फॉलोअप, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यास सांगण्यात आले आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत ९५ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पुढील आठवड्यापासून, सोमवारपासून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन टक्के प्रवाशांच्या तापाच्या चाचण्या केल्या जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here