दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसतोड नाही : समडोळीच्या विशेष ग्रामसभेत ठराव

सांगली : साखर कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोड न करण्याचा ठराव समडोळी येथल विशेष ग्रामसभेत करण्यात आला. समडोळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस तोडीसंदर्भात विशेष ग्रामसभा बोलावली होती. या बैठकीला ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मालक उपस्थित होते. त्यामध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ‘जनआक्रोश’ पदयात्रेला सर्वानुमते पाठींबा जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या उसाला प्रति टन अतिरिक्त ४०० रूपये व चालू वर्षाच्या उसाला रास्त दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणीही ऊस तोंड न स्वीकारण्याचा, ऊस तोडणी कामगाराना पैसे न देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

शेतकऱ्यांना आठ तास अखंडीत उच्च दाबाखाली विद्युतपुरवठा व्हावा हा ठराव मंजूर करून घेऊन शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अभियंता, विद्युत विभाग, विश्रामबाग (सांगली) यांना निवेदन देण्याचे ठरले. या ग्रामसभेत ठराव ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी मांडले. ग्रामसभेचे सूत्रसंचालन दीपक मगदूम यांनी केले. या वेळी सरपंच सुनिता हजारे, उपसरपंच कृष्णात मसाले, माजी उपसरपंच प्रमोदकुमार ढोले, ग्रामविकास अधिकारी आय. आर. जेवूर, ग्रामपंचायत सदस्य बंडू देवणे, दस्तगीर मुजावर, राजकुमार पाटील, सचिन रुगे, बाहुबली चिट्टे, सुधीर ऐतवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here