साखर आरोग्यासाठी वाईट नाही. साखरेत अशुद्ध असे काहीही नाही आणि तरीही साखरेमुळे मोठ्या प्रमाणात समस्या येत असल्याचे, कोका-कोला कंपनीचे ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) जेम्स क्विंसी यांनी सांगितले.
क्विंसीने ब्राझीलच्या यूओएल न्यूज वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, लठ्ठपणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंपनी पोर्टफोलिओ तय्यार करत आहे ज्यामध्ये लहान पॅकेजिंगसह अनुकूल उत्पादने पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आमचचे उद्दीष्ट निश्चित नाही, कारण ग्राहकांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या हेतूचे समर्थन करतोय, ज्यामुळे शरीरातल्या साखरेचा उष्मांक 10 टक्क्याने कमी होईल, असेही ते म्हणाले.