पुणे : साखर कारखान्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (एसएसएस) नेते राजू शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार शेट्टी यांनी बारामतीमध्ये बुधवारी ऊस परिषदेचे आयोजन केले होते. तेथे त्यांनी इथेनॉलकडे वळवल्याने साखर कारखान्यांच्या उताऱ्यातील घट ( recovery loss) मोजमापाच्या पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले. बैठकीत शेट्टी यांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे असे सांगितले.
अलिकडेच माजी खासदार शेट्टी यांनी २०२२-२३ या गळीत हंगामात साखर कारखान्यांना विक्री केल्या जाणाऱ्या ऊसासाठी पहिली उचल म्हणून सरकारकडून जाहीर योग्य आणि लाभदायी दरावर (FRP) ३५० रुपये प्रती टन देण्याची मागणी केली होती.