मॉन्सूनबाबत हवामान विभागाकडून खुशखबर, या राज्यांत होणार जोरदार पाऊस

नवी दिल्ली : प्रचंड उकाड्याने त्रस्त देशाच्या अनेक राज्यांना मान्सूनची दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. यातील अनेक राज्यांना हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, दक्षिण – पश्चिम मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात आगेकूच करू शकतो. हवामान विभागाचे वरिष्ठ संशोधक आर. रे. जेनामणी यांनी सांगितले की, पूर्व-मध्य अरबी समुद्रावर एक चक्रीवादळ आधीच तयार झाले आहे. हे चक्रीवादळ मान्सूनला पुढे सरकण्यास मदत करेल. मान्सून कमजोर झालेला नाही. तो धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमडीने सांगितले की, पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि पश्चिम-मध्य आणि उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीच्या काही भागात पुढे सरकण्यायोग्य स्थिती निर्माण झाली आहे. भारताला कव्हर करणारा मान्सून गेल्या काही दिवसांपासून मागे आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना खरीप हंगामातील पेरण्यांसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. १० जूनपर्यंत खरेतर मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत तो तामीळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकाच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. आगामी पाच दिवसांत तो आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरामध्ये चांगलाच बरसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here