महाराष्ट्रात कर कपातीनंतर पेट्रोल, डिझेलचे हे आहेत नवे दर

मुंबई : देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारने पेट्रोलमध्ये ८ रुपये आणि डिझेलमध्ये ६ रुपयांच्या अबकारी करात कपात केली आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोल, डिझेल स्वस्त जाले आहे. नवे दर लागू झाले आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलच्या दरात ९.१६ रुपयांची कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. तर डिझेल ७.४९ रुपये स्वस्त झाले आहे.

याबाबत एबीपी लाइव्ह डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये तर डिझेल ९७.२८ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर पुण्यात पेट्रोल ११०.९५ आणि डिझेल ९५.४४ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. नागपूरमध्ये डिझेल ९५.९२ रुपये आणि डिझेल १०३.०६ रुपये प्रती लिटर झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १११.८३ रुपये तर डिझेल ९६.२९ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल ११३.०३ रुपये आणि डिझेल ९८.९५ रुपये प्रती लिटर दराने मिळेल. ठाण्यात पेट्रोल १११.४९ आणि डिझेल ९७.४२ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १११.३२ आणि डिझेल ९५.८२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here