पाकिस्तानसारख्या देशांना एका झटक्यात खरेदी करू शकतात हे अब्जाधीश

नवी दिल्ली : जगात अब्जाधिशांची संख्या गतीने वाढत आहे. भारतातही अब्जाधीश वाढले आहेत. फोर्ब्सने जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली आहे. या यादीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचे बर्नार्ड अर्नोल्ट आणि त्यांचे कुटूंबिय द्वितीय तर जेफ बेजोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेचा दबदबा कायम आहे. याशिवाय, फ्रान्स आणि मेक्सिकोतील प्रत्येकी एका अब्जाधीशाचा समावेश आहे. यादीत अमेरिकेतील आठ अब्जाधिश आहेत. या अब्जाधीशांची संपत्ती अनेक देशांच्या जीपीडीपेक्षा अधिक आहे.

टॉप १० अब्जाधिशांमध्ये लॅरी एलिसन, बिल गेट्स, वॉरेन बफेट, स्टीव बाल्मर, लेरी पेज, कार्लोस स्लिम हेलू आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. एलन मस्क यांची संपत्ती २३४.१ बिलियन डॉलर म्हणजेच १९ लाख २० हजार ७२३ कोटी आहे. बर्नार्ड अर्नोल्ट द्वितीय क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३०.३ बिलियन डॉलर म्हणजे १८,८९,५४५ कोटी रुपये आहे. जेफ बेजो यांची संपत्ती १५१.७ बिलियन डॉलर. लॅरी एलिसन यांची संपत्ती १४६.३ बिलियन डॉलर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here