गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटेला सुरुवात झाली आहे. तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. रब्बी पिकांच्या पेरणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यापूर्वी तापमान वाढीमुळे ते चिंतेत होते. डिसेंबरच्या सुरुवतीच्या काळात तापमान नेहमीपेक्षा अधिक वाढले होते. अशा स्थितीत रब्बी पिकांची लागवड करणे नुकसानीचे ठरणार होते. आता थंडीची लाट सुरू झाल्याने त्याचा फायदा या काळात होईल. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती.
आज तकमधील वृत्तानुसार, दोन वर्षापूर्वी हिवाळ्यातील तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनात उच्चांकी घसरण नोंद झाली होती. जर थंडी आणि थंडीची लाट अशीच वाढली तर ते अनेक पिकांना फायदेशीर ठरेल. गहू आणि मोहरीच्या पिकाचे उत्पादन वाढू शकते. जेवढी थंडी वाढेल, तेवढे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. मात्र, थंडीच्या लाटेचा परिणाम टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, मुळा यांसारख्या भाजीपाल्यावर होतो. थंडीमुळे ही पिके काळी पडतात. मात्र, काही उपायांतून शेतकरी आपल्या पिकांना वाचवू शकतात. थंडी वाढली तर पिकांवर प्लास्टिकचे आवरण घातले जाते. मात्र, हे उपाय महागडे आहेत. प्रत्येक शेतकरी असे उपाय करू शकतीलच असे नाही.